Home Breaking News नांदगाव बोरगाव येथील झोपडपट्टीवासी यांची पाण्याची समस्या एका महिन्यात सुटेल

नांदगाव बोरगाव येथील झोपडपट्टीवासी यांची पाण्याची समस्या एका महिन्यात सुटेल

 

पालकमंत्री सुनील केदार यांच्या कडे समस्या सांगितल्यानंतर 5 मार्चला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी नांदगाव येथे भेट दिली.
चौकशी करून नांदगाव बोरगाव येथील झोपडपट्टी यांची पाण्याची समस्या सोडून एक महिन्याच्या आत येथील झोपडपट्टी रहिवासी यांना पाणी उपलब्ध होईल. असे झोपडपट्टी वासियांना सांगितले .
हिंगणघाट पंचायत समिती गट अधिकारी चौधरी यांनी प्रशासकीय कामाची पूर्तता करून नांदगाव येथील पाण्याच्या टाकीवरून पाण्याची पाईप लाईन टाकून झोपडपट्टी वस्ती मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. सूर्या मराठी न्यूज कडून बोरगाव नांदगाव झोपडपट्टीवासी यांची पाण्याची समस्या ला वाचा फोडली, पाठपुरावा केला त्याला यश मिळाले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा