नांदगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

0
471

 

तालुका प्रतिनिधी- सचिन पगारे नांदगाव

नांदगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रानभाज्यांचे आरोग्य विषयक महत्त्व व माहिती ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मिळावी व विक्री व्यवस्था निर्माण करून शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा यासाठी नांदगाव येथे रविवार दिनांक 15/08/2021रोजी ठीक 10.00वाजता तालुका कृषी अधिकारी नांदगावच्या आवारात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महोत्सवाचे उद्घाटन माननीय आमदार सुहास आण्णा कांदे साहेब करणार आहेत.मानवी आरोग्यासाठी सकस आहाराचे अनन्यसाधारण महत्त्व आहे, रानातील तसेच शेत शिवारातील नैसर्गिक रीत्या उगवल्या जाणारया रान पालेभाज्या,कंद व फळभाज्या यामध्ये शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक अन्न घटक व औषधी गुणधर्म असतात सदर रानभाज्या या नैसर्गिक रीत्या येत असुन त्यावर रासायनिक किटकनाशके व बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नाही, त्यामुळे या संपूर्ण नैसर्गिक असल्याने शरीरासाठी अतीशय उपयोगी आहेत नांदगाव तालुक्यातुन जातेगावचे शेतकरी श्री.पोपट राऊत तसेच वेहळगाव येथील शेतकरी श्री.महेंद्र चकोर या शेतकऱ्यांनी करटोली, तोंडली,आर्वी या पिकांची लागवड केली आहे.श्री.महेंद्र चकोर यांनी एक एकर क्षेत्रामध्ये ९०क्विटल आर्वी ही कंद भाजी उत्पादन केली असुन इतर शेतकरी देखील आळु,कुर्डु, गवती चहा,शेवगा,पाथरी, तांदुळजा,काठेमाठ, अंबाडी व गुळवेल इत्यादी औषधी वनस्पती व पालेभाज्या, फळभाज्या लागवड करीत आहे.
तरी नांदगाव शहरातील शहरवासी व ग्रामीण भागातील शेतकरी बंधू यांनी उद्या रविवारी दिनांक १५/०८/२०२१ रोजी सकाळी ठिक १०.०० वाजता आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here