नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
शहर व ता . च्या हद्दीत शिधा वाटप पत्रिकेवर मिळणारे गहू तांदूळ गहू ज्वारी व मका हे धांन्य अंत्यत निकृष्ठ दर्जाचे व कोणत्याही प्रकारची दर्जा नसलेले धान्य असुन त्या पासुन अनेक प्रकारचे शारीरीक व्यंग व दुर्धर आजार नागरिकांना होत आहे सदर शासकीय धांन्ये गोदामात बऱ्याच दिवसापासून पड्न असलेलल्या व सडक्या स्वरूपाचा धांन्यसाठा नागरीकांना देण्यात येत असुन त्याबाबत संबंधित गोदाम निरीक्षक व पुरवठा निरीक्षक यास वारंवार सांगूनही तोच सटका साठा शिधावाटप दुकानदारांना वाटप करण्यात येतो व चांगल्या प्रतीचा असलेल्या उत्कृष्ट धान्य खुल्या बाजारात दलालांमार्फत सर्रास विकल्या जाते सदर प्रकरणात बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांना याबाबत या अगोदर अवलोकन केले आहे. याकरीता बहूजन समाज पार्टीच्या वतीने नांदुरा तसीलदारांना निवेदन देण्यात आले.







