हिंगणघाट (२०/९) शहरात पर्यावरण तथा पशु पक्षी संवर्धनासाठी कार्यरत निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने यंदा शहरात आढळणारया फुलपाखराचे संवर्धन तथा जनजागृती होण्याचे दृष्टीने ‘ फुलपाखरू महोत्सव’ आयोजित करण्यात आला असुन या महोत्सवांतर्गत शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क चित्रकला, निबंध स्पर्धा, छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी आपले साहित्य ज्योतिर्लिंग टायपिंग एल आय सी आफीस जवळ,नेताजी किराणा दुकान,पराग बुक डेपो,सत्संग मेडीकल, अरविंद दहापुते गोमाजी वार्ड यांचे कडे २५ सप्टे पुर्वी पाठवावेत,तद्वतच आपले साहित्य https://forms.gle /3bnmzEYyZFSZvckf8 या लिंकवर पाठवुन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन निसर्ग साथी फाउंडेशन चे वतीने प्रविण कडु,राकेश झाडे , गुणवंत ठाकरे, अरविंद दहापुते,रश्मी चंदनखेडे ,प्रा डॉ बालाजी राजुरकर, प्रभाकर कोळसे आदींनी केले आहे .
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

