पत्रकार भवणासाठी जागा उपलब्ध करून द्या राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाची नगर परिषद नांदुरा कडे मागणी- मुख्याधिकारी यांना दिले निवेदन

0
297

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. समाजातील सर्वच छोट्या मोठ्या बातम्या जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. तसेच नांदुरा शहरात पत्रकार परिषद घेण्यासाठी सुद्धा हक्काची जागा नाही. यामुळे नांदुरा शहरात पत्रकार भवन बांधून मिळावे यासाठी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे साहेब यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली असता. नगर परिषद कडून जागा उपलब्ध करून घ्या मी पत्रकार भवन बांधून देतो असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले. म्हणून आज दिनांक २२ जुलै २०२१ रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्रकार भवनाच्या जागेच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका संघटक श्रीकांत हिवाळे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,रतन डोंगरदिव,अरुण सुरवाडे,सुशील इंगळे व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here