नांदुरा(प्रफुल्ल बिचारे):-
शहरात पत्रकार भवन बांधण्यासाठी नगर परिषदेची योग्य जागा पत्रकारांना द्या याकरिता नांदुरा शहरातील कर्तव्यदक्ष नगराध्यक्षा मा.सौ.रजनीताई अनिलजी जवरे यांना राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने निवेनाव्दारे मागणी केली आहे. व येणाऱ्या मासिक सभेत ठराव मंजूर करण्याचे आश्वासन रजनीताई यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे,नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष शिवाजी चीमकर,तालुका प्रसिद्धीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,तालुका कार्याध्यक्ष राहुल खंडेराव,तालुका संघटक श्रीकांत हिवाळे,शहराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,शहर उपाध्यक्ष नजीर रजवी,रतन डोंगरदिव,अरुण सुरवाडे,सुशील इंगळे व इतर पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते.