अजहर पठाण सेलू/परभणी
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाच्या तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा सेलू भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.
या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांना क्षती पोहचवून जी अशोभनीय परंपरा पश्चिम बंगालमध्ये अखिल भारतीय तृणमुल काँग्रेसने चालवीली आहे अश्या अराजक कृत्याचा भाजप युवा मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचेनिवेदन नायब तहसीलदार सेलू श्री.प्रशांत थारकर यांना देण्यात आले.
निवेदनावर राजवाडी येथील सरपंच
तथा सेलू भा. ज. युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री. शिवहरी शेवाळे, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री. रवींद्र डासाळकर, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. दगडोबा जोगदंड पाटील, सेलू शहर अध्यक्ष श्री. कपिल फुल्लारी, जयसिंग शेळके पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.







