पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ! पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा !! ..ना वाढदिवस ‘एनिवर्सरी ‘फक्त आणि फक्त ड्युटी !

0
372

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

पोलीस म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो तो खाकी वर्दीतला माणूस !कठोर शब्दात बोलणारा तर कधी प्रेमाने बोलणारा !

होय खाकी वर्दीतला लोकांचे रक्षण करणारा आपली ड्युटी तन-मन-धनाने करणारा म्हणजे पोलिस! . सद्रक्षणाय ..खलनिग्रहणाय ! हे ब्रीदवाक्य खाकी वर्दीतील प्रत्येक पोलिसांच्या अंगावरती असते !

म्हणजेच चांगल्या माणसाची तुम्ही रक्षण करावं !दृष्ट लोकांना शासन करा !

परंतु काही वेळेस चांगल्या लोकांना शासन होतं तर काही दृष्ट लोकांना ही शासन होतं .ही गोष्ट वेगळी !

पोलीस तपासामध्ये दोन्ही बाजूंचा सारासार तपास करून योग्य पद्धतीने न्यायनिवाडा करण्याचे काम करत असतात !

परंतु एका बाजूने न्याय देताना दुसऱ्या बाजूच्या लोकांच्या नाराजीचा सामना त्यांना करावा लागतो .
अनेक वेळा दारू अड्ड्यावर ती किंवा जुगार अड्ड्यावर छापा मारतांना त्यांना लोकांच्या किंवा अवैध धंदे वाल्याच्या सामना करावा लागतो .

पोलीस कसाही असला तरी शेवटी तो पोलीस असतो .आणि ते आहेत म्हणून
महिला सुरक्षित आहेत .

मागील भाग सोडला तर गेल्या दीड वर्षापासून महाराष्ट्र पोलिसांचे अवलोकन केले तर घर दार आई – वडील ‘ मुले . पत्नी .यांना सोडून कोरोनाच्या संकट काळामध्ये लोकांनी विनाकारण बाहेर फिरू नये म्हणून त्यांना धाक दाखविण्यासाठी हातात दंडुका घेऊन ! कोरोना पासून लोकांनी वाचाव म्हणून भर उन्हातानात रस्त्यावर पोलिस दादा उभी असतात !

आणि विनाकारण फिरणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारणा केली असता त्यातही त्याचे वाहन लवकर सोडले नसता लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते !कोरोना संकट काळामध्ये गेल्या दीड वर्षापासून पोलीस आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांचे रक्षण करीत आहे !

त्यामध्ये अनेक पोलिस दादांचा धोरणामुळे लोकांचे रक्षण करत असताना कोरोना ची लागण होऊन आपला जीव गमवावा लागला आहे ।

आणि दररोज पोलीस लोकांचे रक्षण करत असताना उपचाराअभावी मृत्यू ची झुंज देत आहेत :

अनेक तरुण पोलिसांचे नुकतीच लग्न झालेली असते लहान मुलं घरी असतात म्हातारे आई वडील असतात ‘ पत्नी असते .या सर्वांना घरी सोडून मंत्री असतील खासदार असतील आमदार असेल कुठे भांडण झाले असेल अशा सर्व ठिकाणी पोलिस बंदोबस्त ला जात असतात .त्यांचे रक्षण करत असतात !

असाच एक प्रसंग काल सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी गावात सायंकाळी घडला !अरे निमित्त होते बुलढाणा जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणेजी काही कामानिमित्त
सरपंच विनोद खरात यांच्या शेतामध्ये पाहणी करण्यासाठी आले होते !

पाहणी करत असताना एका ठिकाणी लोकांच्या अडीअडचणी सोडवत असताना थोड्या अंतरावर त्यांच्या ताब्यातील पाच ते सहा पोलीस कर्मचारी साखरखेर्डा येथील दुय्यम ठाणेदार राणे साहेब व मी पत्रकार सचिन खंडारे ‘असे आम्ही चर्चा करत बसलो होतो ‘अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याला छोट्या मुलीचा फोन आला ‘पप्पा आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे केक कधी आणताय !

हे शब्द ऐकून पोलिसांनी आपल्या छोट्या मुलीला गमतीशीर उत्तर दिले की बाळा मला घरी यायला रात्रीचे ११ वाजतील ‘आणि त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा लग्नाचा सहावा वाढदिवस होता ‘यावरूनच पोलीस कुठल्याही प्रकारचा सण-उत्सव साजरा करता त्यांना येत नाही नेहमीच लोकांच्या रक्षणासाठी ते बाहेर असतात ‘लोकांचे रक्षण करत असतात .आणि तेवढेच ते कठोर असतात तेवढे ते मनाने मवू सुद्धा असतात !
अर्धा तासा चर्चा केल्यानंतर मी तिथून घरी आलो ‘परंतु अजूनही माझ्या डोक्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलीचा फोन घुमत होता !

खरंच पोलिसांना घर .दार पत्नी .मुल सोडून इतरांचे रक्षणासाठी झटत असतात ‘ पोलिसांमुळेच सर्वसामान्य लोक आज लग्न साजरे करतात वाढदिवस साजर करतात ‘आमदार . खासदार ‘ मंत्री ‘ कार्यक्रम साजरे करतात ‘परंतु अहोरात्र लोकांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या पोलिस बांधवांना मात्र कुठलाही सण उत्सव वाढदिवस साजरा करता येत नाही !

म्हणून पोलीस कितीही कठोर वागले तरी त्यांच्याही मनामध्ये मायेचा पाझर फुटत असतो ! ‘

पोलिसाच्या आतही असतो माणुसकीचा झरा ‘
पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here