गजानन सोनटक्के जळगांव जा
मा आ श्री गोपिकीशन बाजोरिया साहेब यांच्याकडे नगरसेवक श्रीकृष्ण केदार यांची मागणी
दिनांक 6 ऑगस्ट 2021 रोजी मा आ श्री गोपीकिशन बाजोरिया साहेब यांच्या दौऱ्या दरम्यान नगरसेवक तथा काँग्रेस सेवादल चे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकृष्ण केदार यांनी प्रभाग क्र 1 मधून बुऱ्हाणपूर रस्त्याला जोडणारा जोड रस्त्याच्या बांधकाम करिता निधी उपलब्ध करून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली असता मा बाजोरिया साहेब यांनी त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला व निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
ह्याप्रसंगी शिवसेना जिल्हा उप प्रमुख तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख तथा गटनेते गजानन वाघ,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा न प गटनेते अर्जुन घोलप,नगरसेवक रमेश ताडे,कलीम खा हुसेन खा,खरेदी विक्री संस्थाचे संचालक संजय भुजबळ, युवासेना जिल्हा प्रमुख विठ्ठल सरप तालुका प्रमुख विशाल पाटील,शिवसेना अल्पसंख्याक शहर प्रमुख शेख चांद कुरेशी,शेख शरीफ कुरेशी, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते







