आर्वी तालुका प्रतिनिधी
प्रज्वल यावले
केंद्र सरकार द्वारा पारित कृषी कायद्यांच्या विरोधात व दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात आज आर्वी येथून प्रहारचे नेते बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी ते दिल्ली सायकल रॅलीला राज्यमंत्री व प्रहारचे संस्थापक बच्चु कडू यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली.यावेळी रॅलीच्या सुरूवातीला झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर राज्यमंत्री बच्चु कडू व कार्यक्रमाचे आयोजक बाळा जगताप यांच्यासह लढा संघटनेचे संस्थापक संजय देशमुख, पूर्व विदर्भ प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष गजूभाऊ कुबडे, नागपूर जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, वर्धा जिल्हा अध्यक्ष जयंत तिजारे, देवळी पुलगाव विधानसभा प्रमुख राजेश सावरकर, पंचायत समिती सदस्या अरुणा सावरकर, सुधीर जाचक, अक्षय भोने, निलेश ठाकरे आदी उपस्थित होते.
राजे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली. राज्यमंत्री बच्चु कडू यांनी आपल्या मनोगतात सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर आपल्या खास शैलीत आसूड ओढले.
आयोजक बाळा जगताप यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर करून रॅलीचे नियोजन, सुरुवात, उद्देश आपल्या भाषणात स्पष्ट केले. राज्यमंत्री बच्चु कडू, बाळा जगताप, संजय देशमुख यांनी सायकल चालवून व हिरवी झेंडी देऊन रॅलीला सुरवात केली. सभेचे संचालन प्रहार कार्यकर्ता विवेक ढवळे तर आभार देवळी पुलगाव विधानसभा अध्यक्ष राजेश सावरकर यांनी मानले.

