Home Breaking News प्रेमभंगातुन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

प्रेमभंगातुन युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट दि.१६ जून प्रेमभंगातुन आज एका युवतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असतांनाच जागरुक नागरीकांनी वेळीच मदत केल्याने त्या युवतीचे सुदैवाने प्राण वाचले.
सदर मुलीने हिंगणघाट पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार शहरातील शास्त्री वार्ड येथे राहणार्‍या या २० वर्षीय युवतीचे मागील चार वर्षापासुन चंद्रपूर जिल्ह्यातील एका युवकावर प्रेम होते.आज दिनांक १६ रोजी सकाळी सदर युवतीने युवकाला फोन करुन लग्नाची गळ घातली.त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने निराशेपोटी सकाळी १० च्या सुमारास घरी आली.तीचे घरीसुद्धा त्यावेळी कुणीही नव्हते.
नैराश्यापोटी तिने सरळ राष्ट्रिय महामार्गावरील वणा नदीचा पुल गाठला व कोणताही विचार न करता पुलावरुन नदीत उडी मारली.या दरम्यान तेथून जाणार्‍यांचे तिच्याकडे लक्ष गेले, तेथून जाणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड करुन नदीत मासेमारी करणार्‍यांचे लक्ष वेधले.मासेमारी करणार्‍यांनी पाण्यात गटांगळ्या खात असलेल्या या युवतीला नदी पात्रातुन बाहेर काढले.वेळीच रुग्णवाहिका बोलावण्यात आली व तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉक्टरांनी तिच्या पोटातुन पाणी काढुन पुढील उपचारासाठी वर्धा रुग्णालयात पाठविण्यात आले.सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिस पुढील तपास करीत आहेत.