नांदुरा:- (प्रफुल्ल बिचारे पाटिल)
तालुक्यातील पोटा या गावात आज दि. १२ एप्रिल रोजी रँपीड टेस्ट मधे तब्बल 77 पेशंट पाँझीटीव आल्याने नांदुरा तालुक्याचे कर्तव्य तत्पर अधिकारी राहुल तायडे तहसीलदार ,नांदुरा प. स. चे गट विकास अधिकारी समाधान वाघ , तालुका आरोग्य अधिकारी खंडारे साहेब , जि प सदस्य वसंतराव भोजने , तलाठी देशमुख मँडम , सचिव काळवाघे ,आरोग्य सेवक, आशा वर्कर्स यांनी पोटा गावात जावून प्रमुख गावकर्यांची बैठक घेतली व 750 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावात 77 पेशंट निघाले म्हणून घाबरून न जाता कोणी ही गावकऱ्यांनी बाहेर जावू नये व कोनालाही गावात येवू देवू नये अशा सुचना केल्या व सकाळ पासुन न च गोळ्या ,औषधे व तपासणी करण्यात येईल
यावेळी विशाल पा सरपंच माजी सरपंच ऊमाकांत पाटील, जलतज्ज्ञ रामकृष्ण पाटील प्रामुख्याने हजर होते.
या गावात आज 145 तापसणी केली असता 77 posotive आढळून आले. पूर्ण गांव containment झोन करण्यात आले व उद्यपासून पूर्ण गांव तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.