अजहर शाह
मोताळा:- तालुक्यातील रोहिणखेड, उबाळखेड व अंत्री शिवारात मागील 15 ते 20 दिवसां पासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून अनेक शेतकऱ्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहे.वन विभाग या घटनां कडून दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांत मोठी दहशत निर्माण झाली आहे.या दहशतीच्या त्रस्त व काही जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी आज 7 जुलै 2021 रोजी मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या कडे धाव घेऊन याबाबतची व्यथा मांडली.
यावेळी मा. आमदार विजयराज शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा करून योग्य कार्यवाही बाबत विचारणा केली मात्र समाधान कारक उत्तर न मिळाल्याने जमलेल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा उप वन संरक्षक श्री.गजभिये यांचे कार्यलय गाठून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
याबाबत बोलतांना विजयराज शिंदर यांनी सांगितले की,”पेरणी करून बसलेला शेतकरी पावसाची वाट बघत आहे त्यातच पीककर्ज,पीक विमा,कर्जमाफी अश्या अनेक समस्यानी शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे.त्यात वन्य प्राण्यांच्या अश्या त्रासाने या भागातील शेतकरी भयभीत झालेले आहे” वन विभागाचे अधिकारी या सर्व घटने कडे दुर्लक्ष करत असल्याची बाबही त्यांनी उप वन सरंक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमा प्रत्यक्ष पणे दाखविल्या.
त्यामुळे धुमाकूळ घातलेल्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करून बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना वन विभागाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी आग्रही मागणी विजयराज शिंदे यांनी लेखी पत्राद्वारे उप वनसरंक्षण यांच्याकडे केली आहे.
उपवन संरक्षक यांची कार्य तत्परता
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून उप वन संरक्षक श्री.गजभिये यांनी तातडीने चार पाच दिवसांसाठी रोहिणखेड येथे “रेस्क्यू टीम” पाठविण्याच्या सूचना दिल्या असून कॅमेऱ्याने ट्रॅपिंग सुद्धा केले जाईल व लवकरात लवकर बिबट्याचा बंद केले जाईल असे सांगितले.त्याच प्रमाणे जखमींना सुद्धा लवकरच आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले.
या आश्वासना नंतर दहशतीत असलेल्या असलेल्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडत मा.आमदार विजयराज शिंदे यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी डॉ वैभव इंगळे,प्रकाश आवटे,भूषण गुजर,सुशांत गुजर,संजय सरोदे,सुभाष बैरागी,गणेश मख, सादिक राऊफ,राजू सरोदे ई ची उपस्थिती होती.






