Home लातूर भव्य नागरी सत्कार

भव्य नागरी सत्कार

डी एस. पिंगळे
निलंगा तालुका प्रतिनिधी

मागे झालेल्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या निवडणूकीत मा.वसंतराव संभाजीराव नागदे साहेब यांचे पॅनल भरघोस मतांनी निवडून आलेले आहे.
त्या निमित्ताने उस्मानाबाद जनता सहकारी बँक शाखा निलंगा यांच्या वतीने नूतन चेरमन मा. वसंतराव संभाजीराव नागदे साहेबांचे व सर्व नूतन संचालकांचा भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी निलंगा नगरीचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीत धुमाळ, हरिभजन पौळ, उस्मानाबाद जनता सहकारी बँक निलंगा येथील सर्व कर्मचारी वर्ग आणि निलंगा नगरीतील प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी उपस्थित होते.