नांदुरा( प्रफुल्ल बिचारे):
– तालुक्यातील पिंपळखुटा खुर्द येथील तरुण तडफदार नेते श्री. विजय कडूजी अढाव पाटील यांची भाजपा युवा मोर्चा नवीन जम्बो कार्यकारणी २३ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजयभाऊ कुटे , जिल्हाध्यक्ष आ.आकाश दादा फुंडकर, जेष्ठ नेते चैनसुखजी संचेती,आ.श्वेताताई महाले पाटील , भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रमदादा पाटील,मा.जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.उमाताई तायडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख , भाजपा जिल्हा सरचिटणीस मोहनजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारणी निवडण्यात आली. या नियुक्ती मुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रदेश स्तरावर विजय पाटील यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पक्षसंघटना मजबूत करून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावून आपल्या पदाला न्याय देण्याचे काम करील अशी प्रतिक्रिया विजय अढाव यांनी व्यक्त केली.







