हिंगणघाट दि.२८
शिवसेनेच्यावतीने भाजपानेत्यांच्या अवमान झाल्याच्या घटनांमधे दिवसेंदिवस वाढ होत असून याप्रकरणी कारवाई केल्या जात नाही,यासाठी संतप्त झालेल्या भारतीय युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री तथा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळीत निषेध व्यक्त केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना चप्पलीने मारतो,थोबाड फोड़तो अशी भर सभेत धमकी देण्यात आली होती.
आमदार संतोष बांगर यांनी कोथळा बाहेर काढील तसेच आमदार संजय गायकवाड़ यांनी घरात घुसुन मारण्याची धमकी दिली.
यवतमाळ शिवसेना विधानसभा प्रमुख संतोष ठेवळे यांनी एनकाउंटर करु अशी धमकी केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांना दिली आहे.
यासंदर्भात आज दि.२८ रोजी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांचे नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहिम राज्यपालांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात महाविकास आघाड़ीचे सरकार असल्यामुळे व त्यात शिवसेना महत्वाच्या भुमिकेत आहे त्यामुळे वरील कुठल्यास नेत्यांवर अजुन पर्यंत कुठलेही गुन्हेदाखल किंवा कार्यवाही करण्यात आलेली नाही,त्यामुळे शहरातील जयस्तम्भ चौक येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.या वेळी युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री कवीश्वर इंगोले,युवा मोर्चा अध्यक्ष सोनु पांडे,तालुका अध्यक्ष विठु बेनिवार,नगरसेवक सोनु गवळी,सिंदि रेल्वे युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमोल गवळी,समुद्रपुर तालुका अध्यक्ष संकेत गवळी,यु. मो.शहर महामंत्री स्वप्निल शर्मा,अतुल नंदागवळी,स्वप्निल सुरकार, गौरव ताबोळी,राहुल दारुनकर,नितीन नादे, सतीष खोंडे, भूषण राऊत, सौरभ वसु,अभय झाड़े, नयन नदवटे,मुकेश गुजराती इत्यादिसह जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा







