अजहर शाह
मोताळा :- तालुक्यातील शेलापुर बु, येथील तरुण तडफदार माजी सरपंच उमेश समाधान वाघ यांची भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीस पदी फेरनिवड करण्यात आली. भाजयुमो नवीन जम्बो कार्यकारणी दि.२२ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आमदार डॉ.संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आ.आकाश फुंडकर, जेष्ठ नेते चैनसुखजी संचेती, आमदार श्वेताताई महाले पाटील, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिनबाप्पु देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी निवडण्यात आली. तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच प्रदेश स्तरावर अभिनंदन वर्षाव करण्यात आला. पक्ष संघटन मजबूत करुन जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लाऊन आपल्या पदाला न्याय देण्याचे काम करील अशी प्रतिक्रिया उमेशभाऊ वाघ यांनी व्यक्त केली






