सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट :- संत ज्ञानेश्वर वार्ड येथील सर्व नागरिक का कडून आम्ही दिनांक 19 एप्रिल2021 ला नगरपरिषद मध्ये आपली भेट घेतल्यानंतर तुमच्या सांगण्यानुसार 30 तारखेला संत ज्ञानेश्वर वार्ड मध्ये असलेली पाण्याची टाकी सुरू करून येथील नळ योजना सुरू करण्यात येईल. ते आश्वासन आपण दिले होते ,परंतु ती आजपर्यंत नळलाईन सुरू झालेली दिसत नाही म्हणून आपण आज महाराष्ट्र दिनापासून पाण्याची टँकर सुरू करावी अन्यथा नळयोजना सुरु करावी असे आपणास विनंती करत आहोत. सन्माननीय सुनील डोंगरे यांनी आमच्या शब्दाचा मान ठेवून आमच्या वार्डमध्ये त्यांनी दिनांक 2 एप्रिल 2021 पासून सलग आतापर्यंत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला परंतु संत ज्ञानेश्वर वार्ड हा मोठा असल्यामुळे एका गल्ली मध्ये टँकर येण्यास त्यांना एक आठवडा लागत असल्यामुळे व एका ड्रम पाण्यात येथील नागरिक कसे वापर करेल हे शक्य होत नसल्यामुळे नगर परिषद कडून ताबडतोब टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा. आमच्या वार्डातील नगरसेवीका मा. धनश्रीताई वरघने, पाणीपुरवठा सभापती माननीय भास्करराव ठवरी हे अजिबात वार्डमध्ये फिरकून पण बघत नाही त्यांनी वार्ड कडे दुर्लक्ष केलेले दिसते.
वार्ड मध्ये भीषण पाणी टंचाई असल्यामुळे ताबडतोब तीन-चार टँकर लावून पाणीपुरवठा करण्यात यावा .