यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
तालुक्यातील मालोद येथे पावसात घराची भिंत कोसळयाने झालेल्या घटनेत एक चिम् कुल्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यातील मालोद या आदीवासी गावात आज दिनांक २५ जुलै रवीवार रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ईमाम दगडु तडवी यांच्या घरातील मातीची भिंत ही वेगाने सुरू असलेल्या पाऊसामुळे अचानक कोसळुन घरात खेळ असलेला ४ वर्षाच्या आबीद इमाम तडवी यांच्या अंगावर ती भिंत कोसळुन तो दुदैवीरित्या जागीच मरण पावल्याची घटना घडली असुन गावातील नागरीकांच्या मदतीने कोसळलेल्या भिंतीच्या ढीगाऱ्यातुन त्याचार वर्षीय बालकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले , मालोद गावात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली , मरण पावलेल्या त्या चार वर्षीय बालकाचे मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ . शुभम तिळके यांनी केले . मयत बालकाचे वडील इमाम दगडु तडवी यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे .मालोद, राजू तडवी ग्रामसेवक, सर्कल ,मालोद येथील तलाठी तेमरसिंग बारेला यांनी तात्काळ घटनास्थळी जावुन घटनेचा पंचनामा केला असल्याची माहीती महसुल सुत्रांकडुन मिळाली आहे







