Home Breaking News मीसाबंदिंचा श्री. मोहन गणपतराव जगताप यांचा सत्कार करतेवेळी आमदार समीर कुणावर

मीसाबंदिंचा श्री. मोहन गणपतराव जगताप यांचा सत्कार करतेवेळी आमदार समीर कुणावर

0
242

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट 29.6.21
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण पुढे करून तसेच जनतेचे सर्व मूलभूत अधिकार गोठवून करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५जून १९७५ रोजी देशावर आणिबाणी लादली.तत्कालीन सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात मिसा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लावून देशभऱ्यातील विरोधकांना तसेच संघ स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत हिंगणघाट,समुद्रपुर,सिन्दी परिसरातील अनेकांनी देशहितासाठी तुरुंगाची वाट पत्करली.
लोकशाहीच्या इतिहासातील या काळ्याकुट पर्वाला शुक्रवार, २५ जून रोजी ४६ वर्षे पूर्ण होत झाल्याने विधानसभाक्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मीसाबंदिंचा गौरव केला आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गावागावातून संघ स्वयंसेवकांना शोधून १८ महिन्या करिता तुरुंगात डांबले होते. संघ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु संघ कार्यकर्त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भाजपा सत्तास्थानी पोहचली आहे, सदर मिसाबंदीच्या योगदानामध्ये
हिवरा येथील मोहन गणपतराव जगताप यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून भारतीय जनता पक्षा तर्फे आमदार श्री.समीर कुणावार, यांनी त्यांचा हॄदय सत्कार केला. सत्कार करते वेळी मा. आमदार समीर कुणावार, नगरसेविका रवीला आखाडे, नगरसेवक राहुल सोरटे , समाजसेवक शिवाजी आखाडे, भाजपा शहर कोषाध्यक्ष गणेश ऊगे तसेच नगरसेवक व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here