यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या तक्रारी निकाली काढण्यासंदर्भात आज तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली यात तक्रारदार शेतकऱ्यांनी भाग घेतला . दरम्यान आज दिनांक २५ मार्च रोजी यावल येथील तहसीलच्या प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, तालुका प्रभारी कृषी अधिकारी एस बी शिनारे , कृषी सहाय्यक बी के माचले , कृषी पर्यवेक्षक पी आर कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत २०१९ते २०या कालावधीतील प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत लाभार्थ्यांच्या खात्यात शासकीय अनुदानाची कमी रक्कम प्राप्त झाल्याच्या तक्रारी या निकाली काढण्या संदर्भात महत्वाची बैठक सावखेडा सिम तालुका यावल येथील शिवदास वासुदेव पाटील , डांभुर्णीचे शेतकरी मधुकर बाबाजी नेवे, साकळीचे उमाकांत नामदेव माळी, चिखली येथील सौ . रूपाली निलेश साळवे, डांभुर्णीचे प्रेमचंद धोंडु फालक, न्हावीचे तुकाराम राधो नारखेडे व मनवेलच्या सौ . कविता लक्ष्मण पाटील यांनी या बैठकीत अद्यापपर्यंत प्रधानमंत्री फसल विम्याची पुर्ण रक्कम प्राप्त झाली नसल्याबाबत तक्रारींचे निराकरण करण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या तालुकास्तरिय समितीच्या बैठकीत संबंधीत सेवा पुरवठा करण्याबाबत सविस्तर तक्रारदार शेतकरी आणी अधिकारी यांच्यात चर्चा झाली असुन ,समितीने शेतकऱ्यांच्या पिकविम्याची रक्कम कमी मिळणे बाबतच्या विषयांवर तक्रारी ऐकुन घेतल्यात चर्चेअंती या विषयावर तांत्रीक अडचणीवर कृषी विभाग यावल तालुका यांच्या माध्यमातुन विमा कंपनी यांच्याशी संपर्क साधुन या विषयावर तात्काळ तोडगा काढण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील यांनी तक्रारदार लाभार्थी शेतकऱ्यांना दिली .







