यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन मान्यवरांची उपस्थिती युवकांचा सहभाग

0
422

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यात सर्वत्र कोरोना महामारीच्या संसर्गाने थैमान घातले असता यात रूग्णांसाठी आवश्यक हवा असलेला रक्तचा साठा हा अत्यल्प असुन या पार्श्वभुमीवर येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज सकाळी १oवाजता आयोजीत भारतीत जनता पक्षाच्या वतीने आयोजीत या रक्तदान शिबीरा प्रसंगी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे , जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ .रंजना पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र ( छोटु ) पाटील , जिल्हा परिषद सदस्या सौ . सविता भालेराव , पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी चौधरी , माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल गोवींदा पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी आदी पक्षाच्या पदाधिकारी यांनी या रक्तदान शिबीरास भेट दिली, या रक्तदान शिबीरात युवकांचा मोठा सहभाग दिसुन आला असुन दुपारपर्यंत एकुण ३५ जणांनी या शिबीरात आपले रक्तदान केले . रक्तसंकलना करीत माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव चे तंत्रज्ञ विलास सपकाळे, मदतनिस रामचंद्र पोतदार व सागर खर्चाने यांनी कार्य केले , रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे , नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे , युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रितेश बारी , युवा मोर्चाचे सरचिटणीस व्यंक्टेश बारी, युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस परेश नाईक , सागर कोळी, भुषण फेगडे , हेमन्त चौधरी यांनी परिश्रम घेतले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here