अजहर शाह मोताळा
तिन मजली सुसज्ज इमारत विना मोबदला उपलब्ध करून देण्यासाठी लोकनेते विजयराज शिंदे यांचा पुढाकार
जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी व सूचना
बुलडाणा:- बुलडाणा जिल्हयात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असून रुग्णाची रोजची वाढती संख्या हजारावर गेलेली आहे.त्या प्रमानात जिल्हा आरोग्य यंत्रणा रुग्णाना सेवा देताना कमी पड़त आहे.बुलडान्यात सुरु असलेले स्त्री रुग्णालय इमारत व मूकबधिर विद्यालय येथील कोविड केअर सेंटर फुल झालेले असून आता येणाऱ्या रुग्णाना बेड उपलब्ध होत नाहीये त्यामुळे त्यांची, नातेवाइकांची प्रचंड हेळसांड होत आहे. यासाठी बुलडाणा जिल्हयाच्या ठिकाणी नव्याने अधिक खाटांचे कोविड केअर सेंटर उभरणे अत्यावश्यक झाले आहे, ही बाब लक्ष्यात घेऊन आज माजी आमदार विजययराज शिंदे यांनी चिखली रोड येळगाव स्थित आपल्या संस्थेची तिन मजली सुसज्ज इमारत 300 खाटांचे नविन कोविड केअर सेंटर उभरण्यासाठी “विनामूल्य” उपलब्ध करून देण्याची इच्छा जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून लेखी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
पत्रात नमुद आहे की, चिखली रोड ला टच असणारी संस्थेची येळगाव हद्दीतील गट नं 37 मध्ये तिन मजली इमारत सुस्थितित तयार आहे. सद्यस्थितीत सदर इमारत संस्थे अंतर्गत शैक्षणिक उपक्रम सुरु होते परंतु कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव व शासनाच्या आदेशाने हे सर्व उपक्रम सध्या बंद आहेत. सदर इमारत ही सर्व सुविधांनी सुसज्ज असून इमारतिला विजेची संपूर्ण व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, 50 हजार स्वेअर फुट संपुर्ण RCC बांधकाम केलेल्या 25 वर्ग खोल्या हॉल सुस्थितित आहे.सदर इमारतीत अंदाजे 300 खाटांचे कोविड केअर सेंटर सहज उभे राहु शकेल. इमारतीला निसर्ग रम्य वातावरण असून मोठे मैदान सुद्धा उपलब्ध आहे.सद्य स्थितीत कोरोना काळात वाढती रुग्णसंख्ये मुळे उपलब्ध असलेले कोविड केअर सेंटर हे फुल झाल्याने रुग्णाची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.जागे अभावी रुग्णाना जिव गमवावा लागत आहे.खासगी हॉस्पिटलचीही तिच परिस्थिति असल्याने शिवाय गरीब रुग्णाना नाइलाजाने तिथे अव्वाच्या सव्वा बिले मोजावी लागत आहे.
बुलडाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने संपूर्ण जिल्ह्या भरातून म्हणजेच जळगाव जामोद,मेहकर पासून रुग्ण बुलडाणा येथे 100 किमी अंतरावरुन उपचारासाठी येत आहे. ऑक्सीजन बेड च्या कमतरतेमुळे रुग्णाचे दगावन्याचे प्रमाण ही वाढले आहे.
त्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थेच्या वतीने येळगाव येथील ही तिन मजली सुसज्ज इमारत आम्ही 300 खाटांचे कोविड केअर सेंटर उभरण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत जेणेकरून रुग्णाचे जागे अभावी,बेड अभावी हेळसांड होणार नाही तसेच मेहकर,लोनार,सिंदखेड़ राजा,देऊळगाव राजा,चिखली,बुलडाणा या घाटावरिल तालुक्यातुन येणारे रुग्ण यांना येथे उपचार देता येईल व बुलडाणा शहरातील कोविड केअर सेंटर वर ताणही पडणार नाही.
तरी याबाबत विचार करून 300 खाटांचे एक मोठे कोविड केअर सेंटर जिल्ह्याच्या ठिकाणी उभे करण्यासाठी इमारतीचे तात्काळ आपन स्वतः व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समवेत स्थळ निरीक्षण करून कोविड केअर सेंटर उभारन्यासाठी आपल्या पुढाकाराने युद्ध स्तरावर सकारात्मक प्रयत्न करावे,अशी सूचना व विनंती माजी आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त करून दाखविली आहे.यावेळी किसान मोर्च्या चे प्रदेश सचिव दिपकजी वारे,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे उपस्थित होते.
#जिल्हाधिकारी सकारात्मक :
सदर मागणी व सूचना विचाराधीन असून आपन याबाबत सकारात्मक असून लवकरच इमारतीची पाहणी करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.







