गजानन सोनटक्के जळगाव जा
जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव ग्रामपंचायत मधील वार्ड नंबर एक मधील ग्रामपंचायत कार्यालय मागच्या बाजूस शंकर रामा कातोरे यांच्या घरापासून ते बऱ्हानपुर रोड पर्यंत रस्त्याची दुर्दशा फार खराब झालेली आहे या रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असते त्यामधून लोकांना जाण्या येण्यास त्रास होत असतो व वार्ड नंबर एक मधील जुनी आवजी सिद्ध बँक परिसरातील रस्ते हे मोठ्या प्रमाणात जशाच्या तसेच अवस्थेत आहेत तरी या परिसरात ग्रामपंचायततिने पेवर ब्लॉक व सिमेंट रस्त्याचे कामे करावेत व राहिलेला अर्धवट रस्ता हा बऱ्हानपूर रोडपर्यंत पूर्ण करावा असे निवेदन वार्ड नंबर एक मधील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयास दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी दिले आहे तरी अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा नाहीतर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असे निवेदनात म्हटले आहे या अर्जावर सुरेश मारोती मिसाळ वैभव ढगे अनिल गणेश राव ढगे सुनील जगदेव गवई व परिसरातील नागरिकांच्या सह्या आहेत