सिलोड प्रतिनिधी (सागर जैवाळ)
राधेश्याम फाउंडेशन चा चौथा वर्धापन दिन सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी राधेश्याम फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष वैशालीताई चाकणकर यांनी फाउंडेशनचे उद्दिष्ट व महिलांना उद्योग कसे उभा करता येतील याची माहिती सांगितले . तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी आपली उपस्थिती ठेवली. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा छायाताई घोरपडे, रोहिणीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष हनुमंत घाडगे पाटील, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष संदीप कानडे, ठाणे जिल्हा अध्यक्ष दिलीप वाघमारे, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष सागर जैवाळ, विशाल जगताप, सुनिल पवार, चंद्रकांत वाघुले, जयश्री आहेर, भावना हगवणे, शुभांगी गलांडे, रेश्मा शेख तसेच सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले . सर्व पदाधिकारी ने सांगितले की संस्थापक अध्यक्षा वैशाली ताई चाकणकर यांनी जबाबदारी दिलेली आम्ही समक्ष पार पाडून जनतेला व गोरगरिबांना न्याय व हक्कासाठी लढणार असे सांगितले .