सिंदखेडराजा (सचिन खंडारे )
सध्या महाराष्ट्रामध्ये रात्रीची संचारबंदी दिवसा जमावबंदी . तसेच लॉकडाऊन चे आदेश जारी झाले आहे .त्यामुळे अनेक अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद आहेत ‘अशा परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाच्या असलेल्या csc केंद्र ‘लॉक डाउन काळामध्ये सुरू ठेवण्याची मागणी .पंचायत समिती सदस्य दत्ता आडे ‘व तंटामुक्ती अध्यक्ष संजय पवार .यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .त्यांनी दिनांक 5 एप्रिल रोजी सिंदखेड राजा तहसीलदार यांना मागणीचे निवेदन दिले ‘निवेदनामध्ये म्हटले आहे की ‘अतिशय महत्वाचे असे काम csc सेंटर च्या माध्यमातून होत असते .मुलांचे शिष्यवृत्तीचे अर्ज असतील .मुलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र शाळेतील परीक्षेचे अर्ज ‘जातीचे प्रमाणपत्र .इत्यादी कामे हे सीएससी सेंटर च्या माध्यमातून होत असतात .व ही कामे झाली नाही तर विद्यार्थ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते .व त्यांच्या शिक्षणासाठी अडथळा निर्माण होईल ‘म्हणून लोक डाऊन काळामध्ये .csc सेंटर चालू ठेवण्याची मागणी पंचायत समिती सदस्य दत्ता आडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे !


![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=218%2C150&ssl=1)



![check bounce case/धनादेश अनादर प्रकरणी एकास २ महिने शिक्षा व ८५ हजार रु.दंड. [ शेवटी फिर्यादी मयताचे वारसास अखेर न्याय मिळाला.]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/04/20260401_212526.jpg?resize=100%2C70&ssl=1)
