वडीला नंतर तो ही झाला सैन्यदलात भरती ! ११ वर्षांनंतर शिंदी येथील तरुण सैन्यभरतीत दाखल !

0
1210

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मनामध्ये इच्छा ‘आकांक्षा ‘आणि जिद्द . असली तर मनुष्याला पाहिजे ते मिळू शकते,
अभ्यास जिद्द चिकाटी च्या भरोशावर सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील तरुण .प्रवीण लक्ष्मण चांदोरे हा सैन्य दलामध्ये (जी .डी )मध्ये भरती झाला आहे ‘
सिंदखेडराजा तालुक्यातील रिलेशन भरती ही ८ डिसेंबर रोजी बंगलोर येथे आयोजित केली होती ‘
त्यानंतर 12 डिसेंबरला मैदानी चाचणी झाली .
या मैदानी चाचणी मध्ये सुद्धा प्रवीण पास झाला .व त्यानंतर मेडिकल मध्ये सुद्धा पास झाला ‘
अशा तर्‍हेने प्रवीण हा संपूर्ण आवश्यक असलेल्या सैन्यदलातील परीक्षा पास होत गेला !
त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाली व नंतर परीक्षेतही तो पास झाला ‘

28 फेब्रुवारीला परीक्षा रद्द झाली होती .त्यानंतर परत एका महिन्याच्या कालावधीनंतर 28 मार्च 2021 ला परीक्षा संपन्न झाली .व 21 एप्रिल रोजी निकाल लागला व त्यामध्ये सुद्धा प्रवीण पास झाला ‘

अशा तर्‍हेने तब्बल ११ वर्षांनंतर शिंदीतील एखादा तरूण सैन्यभरती मध्ये दाखल होत आहे ‘

GD,जी डी मध्ये प्रवीण दाखल झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘

प्रवीण चांदोरी चे वडील लक्ष्मण चांदोरे हे देखील सैन्यदलामध्ये होते ‘हो त्यांनी सुद्धा वीस वर्ष देशाची सेवा केली ‘
व आज त्यांचा लहान मुलगा सुद्धा सैन्यदलामध्ये भरती झाला ।
प्रवीण चांदोरी चे कठीण परिश्रम हेच त्यांच्या यशाचे गमक होय !

तरुणांनी सुद्धा देश सेवेसाठी तत्पर राहावे हीच अपेक्षा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here