हिंगणघाट तालुक्यातील वाघोली गावा जवळ लागून असलेल्या पारधी बेडा मार्गाची अंत्यत वाइट दशा झालेली आहे.सुमारे १००लोकांची वस्ती असलेला हा बेडा वाघोली ते खैराटी या मार्ग वर डाव्या बाजूला एक किलो मीटर अंतरावर वसलेला आहेत .पण जाण्यासाठी रोड खूप खराब असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहेत .जर रात्रीला पाणी आला तर रोड ला लागलेला असलेल्या झाडाच्या शेतावरच मुक्काम करावा लागत आहेत .जर कोणी बिमार पडले तर खांद्यावर बसून आणावे लागत आहेत .पाण्याची टंचाई खुप मोठ्या प्रमाणात आहेत .तसेच कोणत्याही शासनाच्या योजना तिथे पोहचत नाही आहे .अजून त्याना घरकुल सारख्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे .अशा परिस्तिथत त्यांच्या कडे लक्ष देणे प्रशासनाचे काम आहेत. जर आता आम्हाला रोड करून दिला नाही तर आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुकीला कोणालाही मतदान करणार नाही.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

