नांदुरा :- प्रफुल्ल बिचारे
तालुक्यातील ग्राम काटी येथे दि २० जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता महाराष्ट्र शासनाच्या
विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पा अंतर्गत संतुलित पशु आहार विषयी संबंधित चर्चा पार पडली. या सत्रामध्ये विदर्भामध्ये श्वेतक्रांती घडवून आणण्या करिता विदर्भामधील शेतकऱ्यांमध्ये दुधव्यवसाया बद्दल जागरूकता निर्माण करून शेतकऱ्यांचे दुग्धत्पादना वरील अतिरिक्त खर्च कमी करून कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन कसे घडवून आनता येईल . दुग्ध उत्पादक शेतकरी जधावराणा देत असलेल्या खाद्याची संतुलित प्रमाणात मात्रा देऊन आहार संतुलनाचे व्यवस्थापन करण्यासंबंधी व तसेच जनावरांमध्ये सामान्यता आढळणारे आजारावर राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी संशोधन केलेल्या आयुर्वेदिक घरघुती उपाययोजना संबंधित व शासनाच्या विविध योजना संबधी आणि शेतकऱ्याच्या सध्य परिस्थिती मध्ये असण्याच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक श्री राहुल पोफळे सर तालुका समन्वयक श्री भूषण तायडे, तालुका व स्थानिक जाणकार श्री श्रीकांत हिवाळे यांनी शेतकऱ्यान बरोबर चर्चा केली. या चर्चा सत्रात काटी येथील श्री.रविद्र हिवाळे, निवृत्ती रोकडे, गणेश हिवाळे, प्रदिब हिवाळे, मोहन मारोडे, गजानन हिवाळे, शाम हिवाळे, कैलास जुनारे, जगन्नाथ हिवाळे, शरद हिवाळे, अमोल हिवाळे व आदी शेतकरी सहभागी झाले होते.