संग्रामपूर -जळगांव जा रोडवरील एमआयडीच्या जवळील पडीत शेतात असलेल्या विद्युत पोलवरील विद्युत वाहिनीचा स्पर्श लागून दुधाळू म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 7 /आगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली आहे.यामध्ये शेतकऱ्यांचे ९०हजाराचे नुकसान झाले आहे. मात्र शेतकरी फेकल्याने त्याचा जीव वाचला. संग्रामपूर एमआईडीच्या परिसरात पेट्रोल पंप च्या मागील बाजूस लागूनच निरोड शिवारातील गट 46 हे लियाकत खाॕ ताजदर खाॕ यांचे शेत असून लागूनच एमआयडीसी चे पडीत जागा (शेत) असून त्यामध्ये म्हैस चरायला गेली असता विजेचा तार लोंबकळत होता त्यातून विद्युत पोलला सपोर्टिंग असलेल्या तारेला वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने म्हशीचा मृत्यू झाला. त्यात शेतकऱ्यांचे अंदाजे 90 हजाराचे नुकसान झाले. शेतकरी म्हैस पाहण्यासाठी गेला असता त्याला विजेचा झटका लागून फेकला गेल्याने त्याचा जीव वाचला. सदर घटना हि विद्युत वितरण कंपनीच्या दुर्लक्ष पणामुळे घडलीचा आरोप शेतकऱ्यांनी केले आहे. त्यामुळे ह्या गरीब दुध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याला विद्युत वितरण कंपनी कडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.