अजहर शाह
मोताळा :- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या स्वातंत्र्यवीर गणपती इंगळे कृषी महाविद्यालय जळगाव जामोद या विद्यालयात स्थानिक विद्यार्थी कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतात . या कृषी तंत्रज्ञानचा फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना व्हावं या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केले. रिधोरा शिवारातील दिगंबर चांगो मानकर यांच्या शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांनी अति महत्वाच्या विषयावर माहिती दिली व चर्चा केली ते म्हणजे माती परीक्षण.दर सहा महिन्याला शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती परीक्षणाकरता प्रयोगशाळेत घेऊन जावी जेणेकरून शेतातील मातीची सुपीकता आपल्या लक्षात येईल व भरगोस उत्पादन घेण्यात शेतकरी सक्षम होईल असे विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.तसेच शेतातील मातीचा नमुना कसा घ्यावा याच प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवले.
या वेळी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य सुद्धा केले.विद्यालयातील विद्यार्थी योगेश गणेश देशमुख याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते व या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी योग्य सहभाग दिला.तसेच कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी कृषी महाविद्यालय चे प्राचार्य श्री योगेश गवई कार्यक्रम अधिकारी श्री अविनाश आटोळे कार्यक्रम समन्वयक कु विद्या कपले यांचे मार्गदर्शन लाभले व महाविद्यालयातील माती विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ.न.एस.सदांशीव यांचे सुद्धा मोलाचे मार्गदर्शन लाभले.







