हिंगणघाट : – दि. २३ ऑगस्ट हिंगणघाट शहरात डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनाला ‘मनसे’चे जिल्हाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. शहरात मागील १ महिन्यापासून डेंग्यू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने झोपी गेलेल्या नगर पालिका प्रशासनाचे शहरावर दुर्लक्ष होत आहे. त्यातच शरातील संपूर्ण भागात अमृत योजने अंतर्गत भूमिगत गटार योजनेचे काम त्यात त्या गटाराचा चेंबर मध्ये डबक्यात पाणी साचून राहते पावसाचा पाण्यात हेच गटारे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी जाण्याकरिता जागाच राहिली नाही त्या पाण्याचे रूपांतर सांडपाण्याचा होत असल्याने त्यातूनच डेंग्यूचे माचार निर्माण होत आहे. या गटार योजनेच्या पाईप लाईन मुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे यातून शहरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
सूर्या मराठीन्यूज साठी सचिन वाघे वर्धा







