वीर जवान अमर रहे च्या..जयघोषणांनी दणदणाला परिसर
चिखली : भारत मातेच्या रक्षणासाठी सियाचीन येथे कर्तव्यावर असलेले चिखलीचे सुपुत्र वीर जवान शहीद कैलास भारत पवार , बीबीचे सुपुत्र शहीद जवान किशोर काळूसे यांना व श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे व्यवस्थापकीय विश्वस्व, कर्मयोगी, युगपुरुष ह.भ.प. स्व.शिवंशकरभाऊ पाटील यांना चिखली येथील गांधी नगर परिसरातील गांधी चौकात नागरिकांनी दि.08 ऑगस्ट रोजी सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले. या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार छोटु कांबळे यांनी केले होते. या कार्यक्रमात सर्वप्रथम शहीद जवान कैलास पवार यांचे बंधू अक्षय पवार यांनी पुष्पहार अर्पण करीत कँडल पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच माजी नगरसेवक शाम शिंगणे, नारायण भोलवनकर,पत्रकार छोटु कांबळे,विक्की धनवे, युवा सेना उपशहर प्रमुख शंभू गाडेकर ,शिवसेना उपशहर प्रमुख रवी पेटकर ,बटी कपूर , सादिक भाई,शंकर देशमुख, भागवत इरतकर सर , विष्णुपंत घोंगे ,भगवान घोंगे ,कमलबाई धनवे ,सत्यभामा भोळवनकर,तुपकर काकू, सागर गायकवाड, सतनाम वधवा निलेश रुद्राक्ष, बबलू पठाण, अनिल जावरे ,शिरसाट सर, प्रतीक शेटे ,सौमेश पैठणकर, राहुल उंबरकर ,सतीश जाधव , लक्ष्मण मोरे ,कुवरसिंग ठाकुर ,मोनु मोरे ,पवन मोरे, यांच्यासह अनेक पुरुष व महिलांनी पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. वीर जवान अमर रहे ..भारत माता की जय..या जयघोषणांनी परिसर दनदणुन गेला होता. ✍️मोहन चौकेकर







