सचिन वाघे वर्धा
दि.13 जुलै हिंगणघाट शहरातील विविध योजनेचे काम सुरू आहे पण त्या कामात नगर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे या कामावर योग्य उपायोजना करावे या बाबत मुख्यधिकारी यांना निवेदनातून केली मागणी.
१) शहरातील संपूर्ण भागात अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजना तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून काम चालू आहे या कामाची मुदत संपल्यानंतर सुद्धा कामे पूर्ण झाले नाही या कामामुळे सिमेंटचे रस्ते डांबरीकरण रस्ते तसेच सिमेंट नाल्या तोडण्यात आले ते आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेले नाही या आपल्या विभागाच्या हलगर्जीमुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे आपण हे काम पूर्ण करण्यास आपले प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे दिसत आहे
२) अमृत योजनेअंतर्गत भूमिगत गटार योजनेतील कामे जवळपास झालेले आहे. पण 60 % वार्डातील काही भागात अजूनही लोकांच्या घरा मागची नाली बंद करून लोकांच्या घरचे आउटलेट ला पाईप जोडून चेंबर पर्यंत नेण्यात आले पण पावसाळ्यातील पाणी पुढे न जाता लोकांच्या घरात नालीचे सांडपाणी परत येत आहे यावर आपण काहीही उपाययोजना केलेली नाही ती त्वरित करण्यात यावी .
३)शहरातील प्रत्येक वार्डात मागील चार वर्षापासून एक दिवसानंतर पाणीपुरवठा नगरपरिषद करीत आहे याबाबत नगर परिषद प्रशासनाचे म्हणणे आहे की पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण झाले मग आपण एक दिवसानंतर पाणीपुरवठा का करतात ? तो नियमित करण्यात यावे व जनतेला सोयी उपलब्ध करून देण्यात यावे .
४) पावसाळ्याच्या काळात विविध वार्डात घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे . हा घनकचरा उचल करणाऱ्या करिता एजन्सी निवडली आहे मग हा संपूर्ण शहरातील कचरा बाबत नगर प्रशासन गंभीर का नाही आपल्या हलगर्जीमुळे कोरोना चा प्रादुर्भाव असताना वेगवेगळ्या आजाराला निमंत्रण देण्याचे काम आपल्यामुळे होत आहे यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा
५) शासनाच्यावतीने लोक उपयोगी नाविन्यपूर्ण योजना संपूर्ण शहरात LED पथदिवे लावण्याचे उपक्रम राबविण्यात आले पण काही प्रभागात अजूनही LED बल्ब लावण्यात आले नाही आणि नगरप्रशासन म्हणतो आहे की संपूर्ण शहरात व वार्डात LED पथदिवे लावण्यात आले यावर स्पष्टता द्यावी ? तसेच शहरातील रस्त्यावरची पथदिवे नेहमी बंद दिसून येते आपल्या जवळ मेंटेनन्स अशी कोणती व्यवस्था नाही यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावे लागत आहे.
६) केंद्राच्या योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत समाजाच्या घटकाला या योजनेचा लाभ मिळावा म्हणून योजना अमलात आणली आहे पण दोन वर्षापासून या योजनेपासून लाभार्थी वंचित आहे असे आमचे सरळ आपल्यावर आरोप आहे यावर तातडीने कार्यवाही व्हावी.
७) राज्य शासनाचे स्पष्ट निर्देश आहे की दिव्यांग धारकांना नगर परिषदेच्या माध्यमातून वार्षिक ठराव घेऊन नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नावर 5 % निधी अनुदान देण्याचे करावे पण नगर प्रशासन दिव्यांगावर अन्याय करीत असल्याचे दिसत आहे . यावर ताबडतोब कारवाई व्हावी
८) हिंगणघाट शहरातील विविध भागात मंदिर , मज्जिद ,बगीचा सांस्कृतिक भवन, अंगणवाडी शाळा , वॉर्डातील काही भागात जवळपास 400 बोरवेल करण्यात आले आहे या बोरवेल चे पाणी ची चाचणी कधीही करण्यात आलेली नाही ? पावसाळ्याच्या काळात नागरिक त्या पाण्याचे उपयोग करीत असताना ते पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही ? याबाबत फलक त्या बोरवेल जवळ लावावा .
९) आपल्या नगरपरिषद मध्ये मुख्य विभाग आहे तो म्हणजे जन्म व मृत्यू चा पण या विभागात लोकांना वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून अशी खूप तक्रार आहे .बाहेरगावावरून येणार्या या लोकांना तर एक दोन दिवस राहुन प्रमाणपत्र मिळतो मिळतो पण काही लोक त्यांच्याजवळ राहण्यासाठी घर नसेल तर त्या लोकांनी का करावे ? हा मोठा प्रश्न आहे याबाबत आपण तातडीने व्यवस्था करावी जेणेकरून लोकांना एकाच दिवशी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे या सर्व मागण्या बद्दल कारवाई करावी अन्यथा पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्यात येईल संबंधित निवेदन देतांना श्री.राजु खुपसरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख,श्री.प्रकाश अनासने उपतालुका प्रमुख,श्री.अभिनंदन ,मुनोत युवासेना जिल्हा प्रमुख,श्री.चंद्रकांत घुसे उपाध्यक्ष न.प.हिं श्री. श्रीधर कोटकर नगरसेवक गटनेता न.पा.हिं.श्री.सतिश ढोबे नगरसेवक,श्री.सुरेश मुंजेवार नगरसेवक,श्री.मनिष देवढे नगरसेवक,सौ.निता धोबे नगरसेविका, श्री.भाष्कर ठवरे नगरसेवक,सौ.सुनिता पचोरी नगरसेविका,श्री.निलेश पोगले नगरसेवक,श्री.बंटी वाघमारे, श्री.महेन्द्रा पचोरी,श्री.देवेंद्र पडोळे माजी नगरसेवक,श्री.शंकर मोहमारे माजी नगरसेवक,सौ.माधुरी खडसे माजी नगरसेविका,सौ.नलिनी सयाम माजी नगरसेविका
श्री.मुन्ना त्रिवेदी, श्री.डॉ.आदर्श गुजर श्री.जयकुमार रोहणकर,श्री.संजय पिंपळकर,श्री.रोहीत बक्षी,श्री.निखील वाघ,श्री.भुषन कापकर,श्री.सोनु कोनप्रतिवार,श्री.हिमेश ढोबे,श्री.नरेश भजभुजे,श्री.कमलेश वझेकर,सौ.हेमा मडावी,श्री.संजय मसानकर,श्री.बलराज डेकाटे,श्री.संजय इटनकर,श्री.नितिन वैद्य,श्री.पांडुरंग निखाडे,श्री.उमेश ढोबे,श्री.रुपेश काटकर,श्री.विजय कोरडे,श्री.सौ.सातपुते, सौ.कल्याणी निखाडे,सौ.भजभुजे,सौ.हेमा मडावी,श्री.अरुण सोनटक्के,श्री.संजय सयाम,श्री.राजु ढोलकीया,श्री.कुलदिप ठवरे,श्री.आकाश निखाडे,श्री.शाम येळणे,श्री.आदर्श भोयर,श्री.सतीश चतुर,श्री.राजु कोल्हे,श्री.अभीजीत चव्हाण,श्री.पाल गुरुजी,श्री.विठ्ठल गलांडे,श्री.नितिन गलांडे,श्री.सौ.रोशनी गलांडे,श्री.अजय मुलरवार,श्री.हिरामण हिंगे,श्री.शंकर झाडे,श्री.भाष्कर मानकर,श्री.गजु राऊत,श्री.विनोद यामाते,श्री.अतुल जुमडे,श्री.मनोज धवड,श्री.एकरी झाडे,श्री.बालु दुर्गे,श्री.गब्बा टापरे,श्री.सुरेश तांदुळकर,श्री.रुपेश कापकर,श्री.श्री.तुळशी लोणकर
संबंधित निवेदन माननीय श्री १)उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र
२) माननीय एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री
३) श्री सुनील केदार साहेब पालकमंत्री वर्धा
४) माननीय जिल्हाधिकारी वर्धा
५) माननीय श्री अनंत गुडे साहेब माजी खासदार व जिल्हा संपर्कप्रमुख वर्धा
६) माननीय श्री अनिल जी देवतारे जिल्हाप्रमुख वर्धा







