शेगांव,,,आशाबाई नामदेव टवरे ही 55 वर्षीय महिला धनोकार नगर शेगांव येथून आपल्या राहत्या घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार पती नामदेव विश्वनाथ टवरे यांनी शेगांव शहर पोलीस स्टेशन ला दिनांक 29,08,2021रोजी दिली होती , सदर महिलेला शोधण्यासाठी त्या महिलेच्या पतीने आपल्या सर्व नातेवाईकांना विचारणा केली परंतु ही महिला नातेवाईकांकडे ही नसल्याने त्यांनी परीसरात शोध चालू केला तरीही महिला सापडली नाही,अखेर तब्बल अकरा दिवसांनी ही माहिला शेगांव येथील आशापुरी सा मिल जवळील इंदरमलजी मुरारका यांच्या मालकीच्या जगेतील खदानमधिल साचलेल्या पाण्यात आज दिनांक 8सप्टेंबर2021रोजी सकाळी अकरा वाजेदरम्यान या महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगत असतांना सापडला , सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन शेगांव शहर ला देण्यात आली,माहिती मिळताच पोलिस हेडकॉस्टबल गजेंद्र रोहनकार, कॉस्टबल नरेश तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सदर प्रेत पाण्यातून काढून शवविच्छेदन साठी सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगांव येथे पाठवण्यात आले, सदर घटना ही पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे।

