शेगाव परिसराला ऑक्सिजन हब बनविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेकडो वृक्ष लावणार- राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा

0
82

 

इस्माईल शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व श्री संत शिरोमणी गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र शेगाव शहर व परिसराला ऑक्सिजन हब बनविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगाव शहर व परिसरात शेकडो वृक्ष लावून त्यांची जोपासना करणार असे प्रतिपादन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा यांनी येथे केले .

शेगाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आज 15 जून ला आयोजित करण्यात आला

होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ध्यान योग फाउंडेशनचे अध्यक्ष प्रख्यात वकील एडवोकेट संजय पोकळे होते यावेळी प्रमुख म्हणून शेगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे शेगाव रेल्वे स्टेशनच्या नवनियुक्त हेल्थ इन्चार्ज लाभीनीताई पाटील, ग्रामपंचायतचे माजी सरपंच भाजपा किसान मोर्चा चे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अरविंद भाऊ इंगळे पत्रकार इस्माईल शेख ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास इत्यादी उपस्थित होते

यावेळी राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या लीना पाचबोले मॅडम ,रूपाली वानखडे ज्योती बावस्कर मॅडम फुलाबाई राठोड मंदाकिनी चव्हाण प्रणिती धामंदे शुद्धमती निखाडे शालिनी कडकडे मॅडम युवा ब्रिगेड अध्यक्ष कुमारी कुसुम रितेश चौहाण, कुमारी दिया शेजोळे पाटील शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र फटिंग बक्कल नंबर 568 यांच्या हस्ते शेगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये वळ पिंपळ बदाम कडूनिंब इत्यादी विविध जातीची वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी उपस्थित

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या सर्व महिला भगिनी पदाधिकारी यांनी झाडांची जोपासना करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमाला रेल्वे विभागातील भिका भाऊ बनकर यांच्यासह रेल्वे विभागाचे कर्मचारी तसेच रेल्वे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here