सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
सध्या कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघता तसेच शासनाने कोरोना ची संख्या वाढत असल्यामुळे राज्यांमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अशा परिस्थितीमध्ये लग्नसराई व इतर कामासाठी विनाकारण फिरण्यावर बंधन आल्यामुळे लोक जास्तीत जास्त वेळ आपल्या शेतीसाठी देत आहे !
सिंदखेडराजा तालुक्यातील बहुतांश शेतामध्ये शेती मशागतीच्या कामाला
वेग आला असून लोक शेतातील नांगरणे ‘वखरणे आदी कामे करण्यामध्ये व्यस्त आहे :
तालुक्यातील ‘शिंदी ‘ गोरेगाव . पिंपळगाव सोनारा ‘ मोहाडी ‘ गुंज ‘ वरुडी ‘रताळी ‘आधी गावा मध्ये शेताची नांगरणी करणे सुरू झाले आहे ‘
वरून कडक लॉक डावून असल्यामुळे लग्नसराई सुद्धा बंद आहे ‘
त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडता येत नाही ‘तसेच कोरोना चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे त्यामुळे लोक घरात व शेतातच आपला वेळ घालवत आहे !
बहुतांश ठिकाणी शेत मशागतीची कामे सुरू आहे ।







