सामान्य माणसाची लॉकडावून मध्ये जगण्यासाठी धडपड सुरू । हातामध्ये चार तास शिल्लक असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर तसेच किराणा दुकानसमोर गर्दी !

0
296

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

राज्यसरकारने दिनांक22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून
राज्यामध्ये कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी सुरू झाली .

त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना यामुळे आळा बसेल ‘वाढता कोरोणा चा संसर्ग बघता तसेच संपूर्ण दवाखाने हाऊसफुल्ल झाले असल्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत इंजेक्शन उपलब्ध नाही ऑक्सिजन उपलब्ध नाही

अशा परिस्थितीमध्ये लोक विनाकारण फिरत असल्यामुळे कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे ‘
आणि याला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे ‘
व अत्यावश्यक सेवा वगळता ‘सर्व दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडे राहतील ‘
त्यामुळे 15 ते 16 दिवसाचा कडक लॉकडावून असताना .
आणखी लॉकडाऊन वाढू शकते ‘
अशी शक्यता असल्यामुळे ‘
दिवसभरात उरलेल्या चार तासांमध्ये ‘
संसाराचा गाडा हाकलण्यासाठी आपला परिवार जगवण्यासाठी .
सामान्य लोक चार तासांमध्ये धडपडताना दिसत आहे ‘
यामध्ये साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासून लांबच लांब रांगा दिसून आल्या .

तसेच किराणा दुकान वर सुद्धा गर्दी दिसून आली .फळाची दुकान असेल स्वीट मार्ट ची दुकान असतील .या सर्वच ठिकाणी सकाळी गर्दी दिसून येते ‘
तसेच अकरा वाजल्यानंतर सर्व सामान्य माणसांना पोलिसांचा सुद्धा धाक असतो ‘त्यामुळे वेळेच्या आत सर्वसामान्य माणसे आपले कामे घाई गडबडीत करताना दिसत आहे ‘

सांगायचे तात्पर्य एवढेच की कोरोनाच्या या महाभयंकर संकट यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात असून आपल्या परीवारा सोबत जगण्यासाठी धडपडताना दिसत आहे ‘आणि म्हणून सर्वांनी वेळेच्या आत कामे झाल्यानंतर घरीच रहावे तोंडाला माक्स बांधावे हाताला सॅनिटायझर लावावे गर्दीत जाणे शक्यतो टाळावे ‘हीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी ठरेल ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here