नवी मुंबई : राज्यस्तरीय “साहित्य उपेक्षितांचे” मासिकातर्फे समूहाचे प्रमुख प्रशासक प्रदीप बडदे (नवी मुंबई) यांनी नववर्ष आणि चैत्र पाडवा निमित्ताने वाचन-लेखन संस्कृती जपण्याच्या उद्देशाने “राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा” गीतलेखन, काव्यलेखन प्रकारात आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, नागपूर, सोलापूर, चंद्रपूर, बीड, अहमदनगर, वर्धा या जिल्हातून तसेच गुजरात व परदेशातील सिंगापूर येथून स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहता व्हाॅट्सएपच्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपात स्पर्धेसाठी कविता मागविण्यात आल्या होत्या.
शनिवार दि.१ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नव संकल्पना आणि नविन विचार अंमलात आणून स्पर्धेचा निकाल ऑनलाईन स्वरूपात जाहिर करण्यात आला. स्पर्धेसाठी सौ. शामला पंडित दीक्षित या व्यासंगी तसेच उत्कृष्ट कवयित्री आम्हाला परीक्षक म्हणून लाभल्या. त्यांचे एकूण पंधरा काव्यसंग्रह प्रकाशीत असून प्रणाली प्रकाशन, चिंचवड च्या मुख्य प्रकाशक आहेत.
ऑनलाईन कार्यक्रमाचे संयोजक तसेच मासिकाचे मुख्य संपादक निलेश बामणे सर(कवी/लेखक/पत्रकार) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून त्यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला लाभले त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला. त्यांची एकूण आठ पुस्तके त्यात काव्यसंग्रह, कथासंग्रह व कादंबरी असे साहित्य प्रकाशित आहे.
स्पर्धेत मुंबई आणि पुणे अशी चुरशीची लढत झाली. कुणी ‘म्हणे पुणे तिथे काय उणे’ तर कुणी ‘आमची मुंबई आमचीच हवा’ असे म्हणत शेवटी सौ. सायली पिंपळे या मुंबईतून सर्वोत्कृष्ट ठरल्या आणि किरणताई मोरे व विजय सातपुते हे पुणे येथून उत्कृष्ट क्रमांकाचे मानकरी ठरले.
प्रथम: शोभा कोठावदे, जयश्री बोदडे, माधुरी फालक, रेखा कुलकर्णी, सानिका पत्की; द्वितीया: रोहिदास बिचकुले, रझिया जमादार, विजया शिंदे, कविता पाचंग्रे, शैला तावरे; तृतीय: सचिन पाटील, रवींद्र गिमोणकर, भाग्यश्री बागड, स्मिता भीमनवार, अशोक वरूडे; विशेष प्राविण्य: प्रतिभा विभूते, चिंतामणी पावसे, जया मुंडे, मीना सानप; लक्षवेधी: माला पारिसे, चेतन मोरे, भावना काळे, भावना गांधिले, हेमलता विसपुते; तसेच उत्तेजनार्थ: सुरेखा मैड, प.सा. म्हात्रे, श्रुती दिवाडकर, मुकूंद देवरे, स्वाती राऊत हे स्पर्धेत सहविजेते ठरले.
ग्राफिक्सकार प्रमोद सुर्यवंशी यांच्या सौजन्याने स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक ई-प्रमाणपत्राने देऊन गौरवण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मासिकाचे प्रमुख संपादक निलेश बामणे सर आणि ग्राफिक्सकार प्रमोदजी सुर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
…✍️@ प्रदीप बडदे, नवी मुंबई