सुनगांव येथील विद्युत पुरवठा नेहमी खंडित राहत असल्या कारणामुळे नागरिकांचे विद्युत वितरण विभागाला निवेदन देत दिला उपोषणाचा इशारा…

0
249

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव येथील विद्युत पुरवठा हा या ना त्या कारणाने नेहमी चालू बंद करण्यात येत असतो त्यातच दोन महिने अगोदर सुनगांव गावठाण फिडर वरील ट्रि कटिंग च्या नावाने चार दिवस कंटिन्यू सकाळी सात ते दुपारी दोन वाजे दरम्यान सुनगाव येथील विद्युत पुरवठा बंद केला होता तरीही दिनांक 9 जुलै रोजी महावितरणने ट्रि कटिंग च्या नावावर सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत लाईन बंद ठेवली होती. तरीही सुनगाव येथील विद्युत पुरवठा हा चालू बंद स्थितीत असतो. उमापूर येथील सब स्टेशनला फोन लावल्यास फोन लागत नाही लागल्यास महावितरणचे कर्मचारी नागरिक उडवाउडवीची उत्तरे देत असतात. सुनगांव येथील वसुली 90 टक्के असून सुद्धा कर्मचारी वसुलीशिवाय दुसरे कोणतेच काम करताना दिसत नाहीत. विद्युत पुरवठा खंडित होत असल्या कारणामुळे वेल्डिंग व्यवसाय गिरण्या बँकेचे व्यवहार घरातील गृहिणींची कामे त्यात सर्वात मोठा विषय म्हणजे गावाला होत असलेला पाणीपुरवठा यावर सर्वात मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्रस्त होऊन सुनगाव येथील नागरिकांनी दिनांक 12 जुलै रोजी जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना निवेदन दिले असता सहाय्यक अभियंता कातखेडे यांनी सुनगाव येथील नागरिकांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली नंतर सुनगावचे सरपंच रामेश्वर अंबडकार तसेच पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे आक्रमक झाले असता सहाय्यक अभियंता कातखेडे नरमले व त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले सुनगाव येथील नागरिकांनी सहाय्यक अभियंता कातखेडे यांना अशी मागणी केली की सुनगाव चा विद्युत पुरवठा जळगाव जामोद येथील शनिमहाराज मंदिराजवळील नवीन सब स्टेशन वर किंवा जामोद येथील सब स्टेशन वरून टाकण्यात यावा तसेच सुनगाव येथील ग्रामपंचायतीने मागील वर्षी या बाबत ठराव दिला होता परंतु एक वर्ष होऊनही या कार्यालयाने कोणतीही दखल घेतली नाही सुनगाव च्या समस्येबाबत कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास सुनगाव येथील नागरिक हे दिनांक 22 जुलै पासून जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण नास बसतील असे निवेदन देण्यात आले निवेदनावर सरपंच रामेश्वर अंबडकार, पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे,अशोक काळपांडे, प्रवीण धर्मे, मोहनसिंग राजपूत, ग्रामपंचायत सदस्य बळीराम धुळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष वंडाळे,सखाराम मिसाळ,पत्रकार गणेश भड,पत्रकार गजानन सोनटक्के, मंगेश वंडाळे,त्रिलोकसिंह राजपुत, लक्ष्मण धुळे,किसन ताडे,देविदास गिर्हे,प्रमोद वानखडे,मधुकर धुळे,गजानन येउल,श्रीराम राउत,संजय राजपुत यांच्यासह बहुसंख्य सुनगाव येथील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here