स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ असेल – रविकांत तुपकर –मोहन चौकेकर

0
393

 

चिखलीत स्वाभिमानीचे हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालय सुरू
चिखली : – चिखली तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, युवक, विद्यार्थी व बेरोजगार तरुणांच्या प्रशासकीय व इतर पातळीवरील कोणत्याही समस्या सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर हे हक्काचे व्यासपीठ व्हावे. आलेल्या प्रत्येक समस्याग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी येथील यंत्रणा काम करेल असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.

चिखली येथे स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर व जनसंपर्क कार्यालयाचे सोमवार २ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना तुपकर बोलत होते. बुलडाणा येथे मागील दोन वर्षांपासून स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटर सुरु आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे हजारो नागरिक, वियार्थी बाहेर जिल्ह्यात अडकून पडले होते. त्यावेळी बुलडाणा येथील हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून अडकून पडलेल्या नागरिकांना पासेस तयार करून त्यांना घरपोच पोहचविण्याची महत्वाची भूमिका पार पाडली. या शिवाय कोरोना बाधित शेकडो रुग्णांना रुग्णालयात भरती करून त्यांना बेड उपलब्ध करून देणे, रुग्णांना इंजेक्शन मिळवून देणे हे महत्वाचे काम स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून आम्ही केले. याशिवाय दररोज शेकडो शेतकरी, युवक व विद्यार्थी आपल्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचे काम बुलडाणा येथे अविरतपणे सुरु आहे. बुलडाणा येथील सेंटरमध्ये ‘ऑन द स्पॉट’ शेतकरी व तरुणांच्या समस्या सोडविल्या जातात. याच धर्तीवर चिखली तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व सामान्य नागरिकांना, तरुण व विद्यार्थ्यांना आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आता बुलडाणा येथे येण्याची गरज राहणार नाही. त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, शासकीय कार्यालयातील कामे चिखली येथील स्वाभिमानी हेल्पलाईन सेंटरच्या माध्यमातून सोडविल्या जातील असेही रविकांत तुपकर यावेळी म्हणाले.

यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा मा. आमदार स्व.गणपतराव देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांना सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच नितीन राजपूत यांचे चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ‘स्वाभिमानी’चे बबनराव चेके,विनायक सरनाईक, भारत वाघमारे, रामेश्वर अंभोरे, भागवत म्हस्के, अनिल वाकोडे, अनिल चव्हाण, अंकुश सुसर, विष्णू आखरे, नितीन अग्रवाल, संदीप मुळे, दत्ता पाटील, रशीद पटेल, विजय बोराडे, सचिन शिंगोटे, संतोष शेळके, सुधाकर तायडे, विठ्ठल चौथे, अमोल मोरे, अमोल तिडके, रवि मेहेत्रे, राधाकिसन भुतेकर, इरफान शेख, विठ्ठल सोळंकी, काशिनाथ बकाल, मयूर बोर्डे, भीमराव हिवरकर, सागर ठाकरे, बाळू पवार, बाळू पाटील, रविराज टाले, अविनाश झगरे, अच्युतराव वाघमारे, छोटू झगरे, उमेश राजपूत, प्रफुल्ल देशमुख, भागवत धोरण, शुभम डुकरे, निलेश नारखेडे, देवेंद्र आखाडे, गौतम सदावर्ते, दशरथ सदार, युनिस शहा सालीम शहा, अरविंद दांदळे, सोनू काळे, कैलास उतपुरे, मिथुन सावळे, मोहन चव्हाण, शुभम शेळके, नाना खटके, सुदर्शन वाघमारे, गोपालराव जाधव यांच्यासह स्वभिमानीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. ✍️ मोहन चौकेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here