हात मदतीचा” सामाजिक बांधिलकी जपणारा व नवप्रेरणा देणारा आदर्श उपक्रम-नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांचे प्रतिपादन

0
238

 

अजहर पठाण सेलू/

“केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहीजे” या उक्तीप्रमाणे समाजाशी घट्ट नाळ जोडणारा व समाजाला नव प्रेरणा देणारा उपक्रम म्हणजे हात मदतीचा असे गौरवोद्गार नायब तहसीलदार आदरणीय प्रशांत थारकर यांनी संयोजक सुनील गायकवाड आयोजित हात मदतीचा या कार्यक्रमात केले.
कोविडमुळे ग्रस्त अशा २१ महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात जीवनावश्यक अन्नधान्य किटचे या वेळी वाटप करण्यात आले.तसेच १०१ महिलांना वाटप करण्याचा मानस संयोजकांनी व्यक्त केला.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येथील छत्रपती शिवाजी नगरात आयोजित या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूद,तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार प्रशांत थारकर, विशेष उपस्थिती निर्मलाताई लिपणे,तलाठी मुकूंद आष्टीकर,ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे,रमेश दौड,प्रशांत ठाकूर, लक्ष्मण दोड , मोहन समुद्रे,वसंत शेरे,विनोद शेरे,शेख साजिद बाबासाहेब लिपणे , कुमार महाजन, यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना थारकर साहेब म्हणाले की कोविडच्या या भिषण परिस्थिती मध्ये एक हात मदतीचा देवून खर्या अर्थाने आपण समाजाप्रती आपली बांधिलकी जपली आहे.

प्रास्ताविकात सुनील गायकवाड यांनी या उपक्रमाचा उद्देश सांगितला.ते म्हणाले की आपणा सर्वांच्या सहकार्याने हा उपक्रम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे.या भिषण परिस्थिती मध्ये देखील नियती कोपली पण माणुसकी जिवंत आहे हे ब्रीद मनाशी घट्ट करून या वर्षीचा हा उपक्रम केला आहे.यासाठी सर्वांनी मनापासून सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
ह.भ.प प्रसाद महाराज काष्टे यांनी सुनील गायकवाड यांचे कौतुक आपल्या शैलीत केले.

अध्यक्षीय समारोप करतांना शेख मेहमूद यांनी या सामाजिक उपक्रमाचा एक भाग होता आले या बद्दल समाधान व्यक्त करत असेच उपक्रम राबविले जावेत असा आग्रह व्यक्त केला.
यशस्वितेसाठी मदन मानमोडे गजानन बागल शुकाचार्य शिंदे अभिजीत गायकवाड दत्तराव किरळकर
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन योगेश ढवारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here