हिंगणघाट :- फिर्यादी आशिष अर्जुनलाल नागरवाळे वय 29 वर्ष हे रेल्वे ठेकेदाराचे साईड अभियंता असुन त्यांनी ते काम करीत असलेल्या येनोरा रेल्वे स्टेशन हाउसचे नवनिर्माणाधीन बांधकामासाठी आणलेल्या एकुण लोखंडी सळाखींपैकी 16 एम.एम. चे 19 सळाखींचे बंडल वजन अंदाजे 02 टन किंमत प्रति टन 43,000/- रूपये प्रमाणे एकुण 86,000/- रूपयांचा माल दिनांक 20/04/22 चे 16.00 ते दिनांक 22/04/22 चे 11.00 वा दरम्यान अज्ञात आरोपीने चोरून नेल्याबाबतची तक्रार दिल्याने सदर रिपोर्ट वर पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्रमांक 503/2022 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
प्रस्तुत गुन्हयाचे तपासात ठाणेदार श्री. संपत चव्हाण यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड यांना गुन्हयासंबंधाने मार्गदर्शन करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने पो.हवा. विवेक बनसोड व त्यांचे पथकाने तात्काळ शोध मोहीम व तपास सुरू करून आरोपी 1) आकाश सुरेष राउत वय 24 वर्ष रा. येनोरा
2) गौतम गोपाल आत्राम वय 19 वर्ष रा. येनोरा यांना निष्पण्ण करून त्यांचे ताब्यातुन 19 बंडल असलेल्या 2 टन लोखडी सळाखी किंमत 86,000/- रूपये , एक बलेरो पिकअप मालवाहु गाडी क्रमांक एम.एच. 30/ए.बी./3979 किंमत 6,00,000/- रूपये असा एकुण 6,86,000/- रूपयांचा माल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. पुढील तपास विवेक बनसोड करीत आहेत.
सदरची कार्यवाही श्री. प्रशांत होळकर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंखे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. दिनेश कदम उप विभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट उप विभाग यांचे मार्गदर्षनात ठाणेदार श्री. संपत चव्हाण, पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे निर्देषानुसार पोउपनि सोमनाथ टापरे व पोउपनि बी.एस. मुंढे यांचे सह गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. विवेक बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडेे, उमेश बेले यांनी केली.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा








