हिंगणघाट नगरपालिका मुख्याधिकारी यांनी केला पदाचा दुरुपयोग

0
636

 

हिंगणघाट – दीनदयाळ अंत्योदय योजना अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान हिंगणघाट नगरपालिकेकडून राबविण्यात येते हिगणघाट नगरपालिका अंतर्गत बेघर नि dhवारा चे देखभाल व व्यवस्थापन करणे करिता ऑनलाइन टेंडर जाहिरात देण्यात आलेली होती व त्यामध्ये प्रेरणा वस्ती स्तर संघ संस्था सर्व अटी व शर्तीनुसार पात्र ठरली असून उपरोक्त बेघर निवारा चे देखबाल व व्यवस्थापन करणे करिता कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिनांक 26- 4 -2021 ते 26 -3- 2022 पर्यंत काम करण्याचा आदेश झालेल्या करारानुसार देण्यात आला होता करारनाम्यातील अटीनुसार बेघर निवाऱ्याची देखभाल केलेल्या कामाचा मासिक अहवाल सादर करण्यात यावा असे सांगितले होते. तरीसुद्धा मुख्याधिकारी अनिल जगताप यांनी पदाचा दुरुपयोग करून अगोदरच दिनांक 25- 3 -21 ला 17855 रुपये 55343 रुपये 85532 रुपये 82728 असे एकूण 241458 रुपयांचा चेक दिला इतकेच नाही तर त्याच दिवशी बँकेतून पैसे ही काढले यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार दिनेश वर्मा समाजसेवक यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here