हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब द्वारा आयोजित राष्ट्रीय फुटबॉल लिग स्पर्धा चे आयोजन व बक्षीस वितरण.

0
332

 

हिंगणघाट: ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट तर्फे दिनांक 17 ,18 19 ,सप्टेंबरला फुटबॉल लिग स्पर्धा चे राष्ट्रीय स्तरावर आयोजन करण्यात आले या स्पर्धेत प्रथम पुरस्कार 7000 हजार व ट्रॉफी द्वितीय पुरस्कार 5000 हजार व ट्रॉफी ही स्पर्धा तीन गटात होती गटात होती 14 वर्षीय ,17वर्षीय मुले आणि खुले महिला गट . यामध्ये इतर राज्यातील फुटबॉल संघ सहभागी झाले होते ए.बी ग्रुप फुटबॉल क्लब ,शक्ती गर्ल्स स्पोर्टिंग क्लब , नागपुर टीम्स अन्सारी क्लब, चंद्रपूर, नाशिक, गोंदिया, वर्धा, आर्वी, बुलढाणा, कामटी तीन संघ मुंबई, दादाभाई क्लब वैकुंडपूर छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, कानपूर, हरियाणा, पंजाबमधून गॅलेक्सी 11 स्पोर्टिंग क्लब चंदीगड एकूण 26 संघ सहभागी झाले.

या स्पर्धेचे उद्घघाटन संगीता रांका यांनी केले, यामध्ये त्यांनी सर्व खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. आयोजकांनी सांगितले की, प्रथमच राष्ट्रीय स्तरावर मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वीरांगना ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमिरे, श्रमिक समर्थ आणि बंधक कामगार संघटनेच्या, आणि चंद्रपूर वर्धा, गडचिरोली विधान परिषदेचे प्रमुख डॉ.रामदास आबंटकर, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार , हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुधीर कोठारी हिंगणघाट नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, लेखक इरफान खान, मुझफ्फर हुसेन, सामाजिक कार्यकर्ते अविनाश
नवरखेले. पत्रकार नदीम सर , मोहसीन खान
कदिर बख्श. शिव सकाळ चे संपादक
उपस्थित होते , आगामी काळात ब्राइट फ्यूचर स्पोर्टिंग क्लबला सहकार्य करण्यास सांगितले.

14 वर्षीय मुलांमध्ये :-
1 पुरस्कार: अन्सारी क्लब नागपूर
2 पुरस्कार: किड्स ब्राईट फ्युचर

17 वर्षांखालील मुलांमध्ये
1 बक्षीस: किड्स ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट
दुसरा पुरस्कार: अन्सारी क्लब नागपूर

आणि खुल्या महिला गटात
1 बक्षीस: किड्स ब्राइट फ्युचर क्लब हिंगणघाट
2 पुरस्कार: रझा स्पोर्टिंग क्लब
ला मिळाला
3 पुरस्कार दिल्ली संघाला देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शर्मा यांनी केले. आयोजक हिंगणघाट ब्राईट फ्युचर क्लब राष्ट्रीय खेळाडू मुस्तफा बक्ष यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here