हिंगणघाट येथील दोन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड, डी. बी. पथकाची कार्यवाही

0
380

 

हिंगणघाट :- दिनांक 22 मार्च रोजी फिर्यादीने त्याचे मालकीची होंडा कंपनीची सीबी व्टिस्टर मोटरसायकल क्र. एम. एच.- 32 / यु – 7547 ही दुकानाचे बाहेर उभी करून दुकानात गेले दिवसभर दुकानात काम करून रात्री 7 वा. दरम्याण घरी जाण्याकरीता ज्या जागेवर मोटरसायकल ठेवली होती तेथे मोटरसायकल दिसुन आली नाही. फिर्यादीची मोटरसायकल ही दुकानाचे समोरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून कलम 379 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची माहिती पो.नि. संपत चव्हाण यांनी पोहवा शेखर डोंगरे यांचे डी.बी. पथकाला सदरचा गुन्हा उघड आणण्याबाबतच्या सुचना दिल्या. सदरची माहीती मिळताच लागलीच पोहवा शेखर डोंगरे व त्यांच्या पथकांनी आपले नेटवर्क चा फायदा व माहीती घेत सदर गुन्हयातील आरोपी अमोल प्रभाकर पुलकंठवार वय 29 वर्षे रा. सेन्ट्रल वार्ड, हिंगणघाट याच्या ताब्यातुन चोरीस गेलेली मोटरसायकल किमंत 20,000 रू. ची जप्त करून गुन्हा उघडकिस आनला. तसेच त्याचे ताब्यातुन पोस्टे अप क्र. 494/2022 कलम 379 भादंवि च्या गुन्हयातील चोरीस गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल किमंत 20,000 रू. असा एकुण जु.कि. 40,000 रू. च्या दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या.
सदरची कामगीरी मा. श्री. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. संपत चव्हाण, पोलीस स्टेशन, हिंगणघाट, यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, सचिन भारशंकर, विशाल बंगाले, यांनी केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here