हिवरा बु . येथे १० गांज्याची झाडे व वाळलेल्या गांज्यासह ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त ! साखरखेर्डा पोलीसांची कारवाई 

0
351

 

सिंदखेड राजा (विशेष प्रतिनिधी )

पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हिवरा बु . येथील एका शेतातून पोलीसांनी १० गांज्याची झाडे आणि वाळलेला गांज्या असा ऐकून ४२ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
१२ एप्रिल रोजी ठाणेदार जितेंद्र आडोळे यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहिती वरुन ठाणेदार जितेंद्र आडोळे , पीएसआय दिपक राणे , पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश मुंढे , पोलीस नायक काशपाग , धुड , रमा गवई यासह दोन शासकीय पंच , फोटो ग्राफर , वजन करण्यासाठी एक व्यावसायीक हेघटणास्थळी गेले . तेव्हा   हिवरा बु . शिवारातील राजू शेळके यांच्या रसवंती मागे शिवाजी त्रंबक शेळके यांचे शेत असून त्यांच्या शेतात कपाशी आणि मका ही पिके घेतली जातात . या  शेतातच शिवाजी शेळके हा गांज्याची शेती करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती .त्याच शेतात शेळके यांची फऱ्हाटीच्या कुडाची झोपडी असून त्या झोपडीत शिवाजी हा बसलेला आढळून आला . त्याची कसून चौकशी केली असता आणि झोपडीची झडती घेतली असता  झोपडीत एका पोतडीत २ किलो ३९२ ग्राम गांजा मिळून आला . अधिकची चौकशी करून मका शेताची पाहणी केली असता शेतातील धुऱ्यावर ७ ते ८ फुट उंचीची दोन व इतर लहान मोठी १० झाडे आढळून आली . पंचासमक्ष पंचनामा आणि झाडाचे वजन केले असता २४ किलो ५२ ग्राम वजन भरून आले . असा एकूण २६ किलो ५०० ग्राम गांजा जप्त करण्यात आला . गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी शेळके हा गांज्याची झाडे लावत असून त्या झाडाचा पाला वाळवून विक्री करीत असल्याचे सुत्रांकडून समजते . या गांज्या व्यवसायामागे आणखी कोन यांचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे आणि दिपक राणे करीत आहेत . आरोपी शिवाजी त्रंबक शेळके वय ५५ वर्ष रा . हिवरा बु . यास अटक केली आहे . त्यामुळे आणखीन आता कोणाकोणाच्या शेतात गांजा आहे याचा तपास होणे गरजेचे आहे ।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here