१९ वर्षीय महिलेचा विनयभंग, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0
710

 

शेगांव : येथील जुन्या महादेव मंदिरासमोरून जाणाऱ्या १९ वर्षीय महिलेचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील  डोबाळवेस भागात राहणाऱ्या १९ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली की, मी दोन जानेवारीच्या रात्री नऊ वाजेदरम्यान जुना महादेव मंदिरा जवळून जात असताना अनिल दिंडोकार यांच्या दुकानासमोर राजेश गजानन घाटोळ हा इतर मुलांसोबत उभा होता. त्यावेळी मला पाहून त्याने एका मुलाला बाजूला करून वाईट उद्देशाने माझा डावा हात धरला आणि शिवीगाळ करुन केस मागे घे अशी धमकी दिली. यावेळी मी माझ्या पतीला फोन करून बोलावून घेतले. तेव्हा तो तिथून निघून गेला होता मी आणि माझे पती त्याच्या घरी आई-वडिलांना समजून सांगण्यात गेलो असता गजानन घाटोळने मला आणि माझ्या पतिला शिवीगाळ करून राजेश घाटोळ तसेच शिवा घाटोळ यांनी मला आणि माझ्या पतिला विट मारून जखमी केले. यावेळी माझा दीर हा सोडविण्यासाठी आला असता त्याला सुद्धा खुर्ची ने मारहाण करण्यात आली. त्यामुळे माझ्या पतीचे उजव्या डोळ्यावर आणि उजव्या हाताला मार लागला माझ्या दिराच्या दोन्ही हातावर कपाळावर मार लागून जखमी केले. यावेळी आरोपींनी जीवाने मारुन टाकू अशा धमक्या दिल्या. या तक्रारीवरून राजेश गजानन घाटोळ, शिवा गजानन घाटोळ,गजानन घाटोळ सर्व राहणार डोबाळवेस यांच्याविरुद्ध कलम ३५४,३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here