नांदुरा:-( प्रफुल्ल बिचारे)
तालुक्यातील पिंपळखुटा धांडे येथील मजूर श्री ज्ञानेश्वर मस्के यांनी कष्टाने मोलमजुरी करून ३५ हजार रुपयांची गाय दुग्धव्यवसायासाठी घेतली होती. परंतु अचानक हे गाय आजरी पडली.श्री ज्ञानेश्वर मस्के यांनी सर्व ढोर डॉक्टर, व पशुवैद्यकीय अधिकारी यांना वारंवार फोन केले परंतु डॉक्टरांचा संप असल्यामुळे एकही ढोर डॉक्टर आजारी गायकडे फिरकला नाही. गाईच्या वाढत्या वेदना पाहून मस्के यांनी वेगवेगळ्या क्रमांकावरून पशुवैद्यकीय अधिकारी यांना ८-१० फोन केले परंतु त्यांनी फोन उचलले नाही. यामुळे आज दिनांक १6 जुलै रोजी या गाईचा उपचार न मिळाल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. कोणाचा जीव वाचविण्याची कला अवगत असलेले सुशिक्षित डॉक्टर असा संप करून आपल्याच व्यवसायासोबत बेइमानी करू करू लागल्यामुळे आज निष्पाप गाईचा जीव गेला. याला जबाबदार असलेले अधिकारी यांना कठोर शासन होऊन संबधित मजुराला झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा अशी गावकऱ्यांची लोकांची इच्छा आहे.







