सेलू तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना घरकुल अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याची भाजपची निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी सेलू व गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी

0
407

 

अजहर पठाण
सेलू/परभणी

सेलू* सेलू तालुक्यातील सर्वच गावामध्ये असंख्य लोकांची नावे प्रपत्र “ड” मध्ये आहेत परंतु सद्यस्थितीत ऑनलाईन कॉम्प्युटर वर दिसत नसून त्यांचे आधार सेडींग व जॉब कार्ड मॅपिंग करता येत नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून सदर बाब अतिशय महत्त्वपूर्ण आहे . केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या या योजनेचे सर्वेक्षण तालुक्यातील पंचायत समिती प्रमुख मा गटविकास अधिकारी यांचे अंतर्गत ग्रामपंचायत ऑपरेटर द्वारे करण्यात आलेले आहे. तरी सदर घडत असलेला प्रकार अतिशय निंदनीय असून यावर योग्य ती कार्यवाही करून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी उपजिल्हाधिकारी सेलू व गटविकास अधिकारी सेलू यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर महादेव गायके जिल्हा कोषाध्यक्ष परभणी भाजप युवा मोर्चा, दगडोबा जोगदंड पाटिल तालुकाध्यक्ष सेलू भाजप किसान मोर्चा सेलू, बळीराम गटकळ पाटील तालुका उपाध्यक्ष सेलू, गोविंद मगर माजी सरपंच सोन्ना आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here